ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसील कार्यालयाकडून पोलीस पाटलांचा सन्मान ; आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य

अक्कलकोट,दि.१९ : २०१९ च्या निवडणूकीत व कोरोना कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी तालुक्यातील ११० पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. अशाच प्रकारे भविष्यातही पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारे काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन तहसीलदार शिरसट यांनी यावेळी केले.

तालुक्यात अनेक वेळा संकटे आली अशा परिस्थिती मध्ये पोलिस पाटलांची खूप मदत झाली असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.मागील लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या काळात मतदान होईपर्यंत प्रशासनाच्या संपर्कात राहून मतदान प्रक्रिया सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. चांगल्या प्रकारची कामगिरी केल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील पुरुष व महिला असे ११० सर्व गावच्या पोलीस पाटील यांचा तहसीलदार शिरसट यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष शिवानंद फुलारी, उपाध्यक्ष मळसिध्द कांबळे, संचिव उमेश देडे,जर्दबाशा कुमठे, प्रकाश बिराजदार, महादेव बिराजदार,सुशांत बिराजदार,संजय बिराजदार,प्रेमनाथ राठोड, अनिल घिवारे, अंबणा अस्वले, विवेकानंद हिरेमठ, दिपक मंठाळे, हुसेनी कारंजे, मिनाक्षी चौधरी, अर्चना पवार, सुरेखा कोटगी, भिमराव पाटील,अनिल पाटील, श्रीशैल बिराजदार, शिवमंगला मुगळीमठ, दिपाली शिंदे, महानंदा माळी, सविता यळमेली, अश्विनी पाटील, रोहिणी पवार, रूपाळी इंगळे, सिध्दार्थ कोळी, वैशाली मोरे, लक्ष्मीपुत्र अंदेवाडी, सुप्रिया गायकवाड, भौरम्मा माळी, साक्षी कोळी, महादेवी पाटील, चंद्रकला गायकवाड, सुप्रिया सुरवसे, महेश कोतले, विजय बावकर, कोषाध्यक्ष संतोश बनसोडे, संतोष गुजा, योगेश जाधव, श्रीशैल कोगनूर,  किरण सुरवसे, सिध्दलिंग मुनाळे दयानंद पुजारी, रेवु राठोड, वाहिदबाशा नदाफ, सिध्दाराम सुतार, कल्लप्पा बंडगर, मल्लिकार्जून मानशेट्टी, महेश कोळी, उमेश जमादर ,संजय कोळी, पंडीत हाळोळीकर आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!