ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार : ‘या’ पार्टीने दिला पाठिंबा

सोलापूर : वृत्तसंस्था

देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तर महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभेच्या उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची ताकद चांगलीच वाढली आहे. प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नरसय्या अडम यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. मात्र वंचित आघाडी तसेच एमआयएमनेही सोलापूरमधून उमेदवार जाहीर केल्याने प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत होती.
अशातच सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपा विरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय, असे आडाम मास्तर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाठिंबा देतानाच प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्यच्या जागेवर नरसय्या अडम यांनी दावा केला आहे. शहर मध्यच्या जागेबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटेल यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये शरद पवारांनी शहर मध्यची जागा माकपला द्यावी, त्याबाबत सिताराम येचुरी यांनी चर्चा करावी असे सुचवले होते. त्यानुसार सिताराम येचुरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला संमती दर्शवली असल्याचे आडाम मास्तर म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!