अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येत्या १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ,पुणे यांच्यावतीने अक्कलकोटमध्ये दहा हजार स्वामी भक्तांना प्रसाद वाटप होणार आहे,अशी माहिती स्वामी समर्थ सेवा सार संघाचे सेवक स्वामी वृंदावन दास व गणेश बारटक्के यांनी दिली.
दरवर्षी प्रकट दिन,पुण्यतिथीच्या निमित्ताने या संस्थेकडून स्वामी सेवा म्हणून अनेक उपक्रम राबविले जातात.त्यांचा भाविक वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.स्वामी सेवेबाबत क्लासेस घेऊन त्यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती संस्थेमार्फत हजारो स्वामी भक्तांना दिली जात आहे.मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात ही व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकट दिनाच्या निमित्ताने यावर्षी ड्रायफूट लाडू, बेसन लाडू, कोकोनट चिक्की ,चॉकलेट कुकीज व हँडमेड चॉकलेट अशा पक्कानांचा भोग लावून हा प्रसाद वाटप केला जाणार आहे.अक्कलकोट भूषण पत्रकार मारुती बावडे यांच्या हस्ते १० एप्रिलला पहाटे साडेपाच वाजता मंगल आरतीच्यावेळी वटवृक्ष मंदिरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामीभक्त सुधीर माळशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.मागच्या दत्त जयंती वेळी स्वामी समर्थांना १ हजार १११ किलो फळांचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आला होता. या उपक्रमासाठी सेवासार संघाचे राज्यभरातील सेवेकरी परिश्रम घेत आहेत.