अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन व बीज प्रात्यक्षिक, तालुका कृषि विभागाचा उपक्रम
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने कमीत कमी खर्चात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत
आहे.
तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना रासायनिक खतामध्ये बचत होऊन कमीत कमी खर्चात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आवश्यक आहे. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आनंद कांबळे, चिदानंद खोबण्णा व आदी तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी प्रत्येक मंडलनुसार गावोगावी जाऊन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व खरीपातील तूर, उडीद, सोयाबीन, मूग आदी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्य दाखवत आहेत.
या मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्याला गावपातळीवरील शेतकरीही उत्तम प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. तालुक्यात कृषी विभागाकडून गावोगावी बैठकीचे आयोजन करून खरीप बियाणे बीज प्रक्रिया, बियाणे उगवण व क्षमता चाचणी अशी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या समोर घेण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यात जवळपास ७० टक्के पेरणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे या उपक्रमाचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.