ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींनी दहा वर्ष नौटंकीच केली ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेश सुरु होत असून आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबले. कारण ते भाजपाविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही, असे ठाकरे पक्षाने सुनावले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी आणि त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटकेच केली. मोदी आता म्हणतात की, देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा, पण दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचे काम मोदी यांनीच केले. देशात विरोधी पक्ष टिकूच द्यायचा नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि बाहेर जे कोणी देशाच्या तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतील अशांना भाजपात आणायचे किंवा तुरुंगात टाकायचे. हे मोदी यांचे धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचे होते काय? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि बाहेर दहा वर्षे जे केले त्यास नौटंकी असेच म्हणतात. आता तेच मोदी बहुमत गमावल्यावर थोडे जमिनीवर आले आणि संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलून गेले की, देशाच्या जनतेला संसदेत नौटंकी, हंगामा, नारेबाजी नको आहे. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे. मोदी यांनी हे सांगणे म्हणजे हुकूमशहाने गीता वाचण्यासारखेच आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!