ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून केली मोठी घोषणा, “या” खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशीयल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.यामुळे देशात नव्या वादाला तोंड फुटले आहे.यावरून काँग्रेस नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

देशाचा गौरव वाढवणारे अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जाणार आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी ३९ गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात १९९१-९२ मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ अमस्टर्डम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!