दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ मेगाविस्तार आज संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्रातील चौघांसह एकूण ४३ जणांची शपथ विधी आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांवर अधिक खात्यांचा पदभार आहे. त्यांच्यावरील जवाबदारी कमी करून नवीन चेहर्याकडे हा कार्यभार दिला जाणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार नारायण राणे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणे यांचा नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातून चार नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारआधी १० हुन अधिक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय कामगारमंत्री संतोष कुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा, महिला व बालकल्याण मंत्री देबश्री चौधरी, अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.