ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंजाबराव डख यांचा अंदाज : ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सध्या गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरु असून आपण सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आहोत. सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतलीय. तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय. अशात आता येत्या काळात पाऊस कसा असेल? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला होणार आहे. 21 सप्टेंबरपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. 21 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.

21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्ता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!