ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात राडा : १३ दुकाने जळून खाक : संचार बंदी लागू !

जळगाव : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दि. 31 च्या रात्री दोन गटात झालेल्या वादातून तेरा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये 21 लाख 25 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले आहे. पाळधी या गावात माजी पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असून त्यांचा मतदारसंघ आहे.

यासीर अमीर देशमुख दीड लाखाचे नुकसान, शेख हबीब शेख शरीफ पान टपरी अडीच लाखाचे नुकसान, शेख हमीद शेख शरीफ मण्यार जनता ऑटो पंधरा लाख, वकार अहमद शेख शकील दोन मोटरसायकल पाच हजार रुपये, फारुक शेख शरीफ इलेक्ट्रिकचे दुकान टीव्ही फ्रिज पाच लाख रुपये, एजाज शेख युसुफ देशमुख विजय बिल्डिंग तीन लाख, दानिश शेख सत्तार दहा लाख रुपये नुकसान, शेख साबीर शेख सारीक मोबाईलचे दुकान दोन लाख रुपये, शेख शकील शेख अब्दुल्ला दोन लाखाचे नुकसान हा क्रम खान अन्वर खान चाळीस हजार रुपये ,अंड्याचे दुकान, रफिक खान अन्वर खान हातगाडी 31 हजार ,शेख तसंवर शेख हमीद ऑटो गॅरेज दहा लाख रुपये तेरा दुकानांचे जळून खाक झाली आहे यामध्ये टीव्ही फ्रिज कार पान टपरी चे साहित्य अशा वस्तूंचे 21 लाख 25 हजार रुपये नुकसान झालेले आहेत. याप्रकरणी पारधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलेली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी व घरातील महिलावर्ग कार ने घरी जात असताना घरच्या रस्त्यामध्ये काही समाजकंटकांनी त्यांची गाडी अडवून गाडीला घेरले व वाद घालू लागले. यावरून हा वाद चिघळला. दोन गटात उफाळलेल्या वादातून दुकाने व वाहनांची जाळपोळ झाली. सकाळपर्यंत तणाव होता. सीआरपीएफ, एस आर पी, जिल्हा पोलीस अधीक्षक डीवायएसपी, सीआरपीएफ या सर्वांनी रात्री पारधी गावात धाव घेऊन वातावरण शांत केले व संपूर्ण गावात बंदोबस्त लावण्यात आला आहे. उद्या सकाळपर्यंत गावात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!