ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘राहुल गांधी, माफी मागा!’; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभेच्या संसदेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितले. वास्तविक, राहुल गांधी यांनी सोमवारी आरोप केला होता की, महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने मतदारांच्या संख्येत हेराफेरी केली आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभेत दावा केला होता की, महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान, भाजपने जिंकलेल्या जागांवर सुमारे 70 लाख नवीन मतदार जोडले, जे हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके आहे.

यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा!’ ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि वीर सावरकर यांची भूमी आहे. तुमचा पक्ष हरला म्हणून तुम्ही लोकांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘तुमच्या पराभवाचा विचार करण्याऐवजी तुम्ही खोटे आरोप करत आहात. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला यासाठी माफ करणार नाही. राहुल गांधी, माफी मागा!’ विरोधी पक्षनेत्यांनी मतदारांच्या माहितीत फेरफार केल्याचा आरोप केला आणि म्हटले की लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात मतांची संख्या हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीइतकीच होती, मात्र, 5 वर्षात जेपढी नावे जोडली जातात तेवढी नवो फक्त पाच महिन्यांत जोडली गेली.

राहुल म्हणाले की, मनोरंजक म्हणजे, ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप जिंकला आहे तिथे नवीन मतदारांची संख्या जास्त आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशसारखा मोठा मतदार जादुईपणे कसा उदयास आला? आम्ही निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकसभा मतदार यादी देण्याची विनंती करत आहोत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!