ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अकलूज येथे बनावट देशी दारू कारखान्यावर धाड, गोवादारू सह साडेअकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई

अकलूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांचे पथकासह अकलूज शहरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उघडकीस आणला असून त्या ठिकाणाहून बनावट देशी दारू, बुचे, गोव्याची दारू ,वाहन इत्यादी. सह ११ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी अकलूज शहरातील राऊत नगर येथे पाळत ठेवून सोनाज पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अक्षदा बेकरी येथील गोडाऊनमध्ये १२ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या पथकासह धाड टाकली. त्या ठिकाणी बनावट देशी दारू तयार होत असल्याचे आढळून आले, सदर ठिकाणी बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा स्पिरिट ब्लेंड, तयार बनावट देशी दारू, देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्वाद अर्क, सिलिंग मशीन, बनावट बुचे, बनावट लेबल, गोवा राज्य निर्मित १८० मिली क्षमतेचे सहा पेट्या विदेशी दारू इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपी इसम प्रदीप रमेश माने, रा.बावडा ता. इंदापूर जि. पुणे व शंकर पंडित चुनाडे रा. अकलूज यांना अटक करण्यात आली असून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाईत पुढील प्रमाणे मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.

जप्त मुद्देमालाचा तपशील

१. देशी दारू टॅंगो पंच बनावट तयार ब्लेंड- ३७० लिटर
२.देशी दारू टॅंगो पंच बनावट तयार कॉन्सन्ट्रेटेड ब्लेंड- ५०० लिटर
३. १८० मिली क्षमतेच्या बनावट देशी दारू टॅंगोपंच-१० बॉक्स
४. कॅप सिलिंग मशीन
५.गोवा राज्य निर्मित अॅड्रीयल व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या- १९ बाटल्या
६. गोवा राज्य निर्मित मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की १८० मिली क्षमतेचे- ६ बॉक्स
७. देशी दारू टॅंगो पंच प्लास्टिक बुचे- २०,००० नग
८.मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की विदेशी दारूचे बुचे- ५०० नग
९. इम्पेरियल ब्लू विदेशी मद्याची बुचे- ५०० नग
१०. देशी दारू टॅंगो पंच लेबल १८० मिली क्षमता – ३२,००० नग
११. २० लिटर क्षमतेचे रिकामे प्लास्टिक कॅन-८
१२. बनावट दारू बाटल्यात भरण्यासाठी नरसाळे- १
१३. विदेशी दारू तयार करण्यासाठी इसेन्स कॅरमल २०० मिली क्षमतेची एक बॉटल
१४. १८० मिली क्षमतेच्या देशी दारू टॅंगो पंच रिकाम्या बाटल्या – ७००० नग
१५. पाण्याचा मोटर पंप- १
१६. पिकअप वाहन-१ MH४३ M ९१०२
१७. मोबाईल- २
१८. चिकटपट्टी बंडल- ७०

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत – ११,५८,५७०/- रु.

सदर कारवाई आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे विभाग अनिल चासकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग संदीप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, अशोक माळी, तानाजी काळे, वाहनचालक दीपक वाघमारे व संजय नवले यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संदीप कदम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!