ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसाने दाखविले रौद्र रूप : घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असतांना आता मुंबई आणि उपनगरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर आपले रौद्र रूप दाखवले आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात मध्यरात्री एका घरावर दरड कोसळल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, या दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील आई आणि मुलगा जखमी झाले आहेत.

सुरेश आणि शालू मिश्रा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आई आरती आणि मुलगा ऋतुराज मिश्रा हे जखमी झाले आहेत. शेजारच्या घरातील दोघे जणही किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. तर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचे काम सुरु आहे. महापालिकेने हा भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात राहू नये अशी नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!