अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट मुस्लिम समाज संस्थेच्या ट्रस्टच्या नूतन प्रभारी अध्यक्षपदी रईस म. शफी टिनवाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अक्कलकोट मुस्लिम समाज संस्थेच्या ट्रस्टी व सल्लागार मंडळाची बैठक समाजाचे
जेष्ठ नेते अशपाक बळोरगी यांच्या प्रमुख उपस्थितीत टिनवाला फंक्शन हॉल येथे पार पडली.संस्थेचा पंचवार्षिक कार्यकाल
संपल्याने व ट्रस्टचे मावळते अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी खासगी कारणास्तव अध्यक्ष पदाचा राजीनामा ट्रस्टकडे दिला होता त्यांचा राजीनामा सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
टिनवाला यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.या सभेस संस्थेचे सर्व विश्वस्त, सल्लागार व पदाधिकारी उपस्थित होते.मावळते अध्यक्ष मूतवल्ली यांनी दहा वर्ष समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थितांचे व समाजबांधवांचे त्यांनी आभार मानले. लवकरच जनरल मिटिंग बोलवून नूतन कार्यकारिणी निवड करण्याचे ठरवून सभा संपली,असे जाहीर करण्यात आले.