---Advertisement---

अक्कलकोट ते कंठेहळळी बस सेवा सुरू करा अन्यथा वंचित आंदोलन; निवेदनाद्वारे आगारप्रमुखांना इशारा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१५ : गेले दहा वर्षापेक्षा
जास्त कालावधी झाला अक्कलकोट ते कंठेहळळी या गावी बस सेवा बंद आहे त्यामुळे येथील गावकऱ्यांना अनेक अडचणींना संकटांना सामोरे जावे लागत आहे.अनेक वयोवृद्ध महिला व पुरुष यांना अक्कलकोट शहर देण्यास अनेक त्रास होत असून प्रसूती महिला आपल्या रुटीन चेकअप साठी टमटम किंवा मोटरसायकलने यावे लागते त्यामुळे त्यांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहेत तसेच शालेय विद्यार्थी रोज पायी चालत जाणे आणि चालत येणे असे शाळेला येत असतात.वेळेवर शाळेला पोचू शकत नाहीत.महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनाही वेळेवर आपल्या महाविद्यालयात पोहोचता येत नाही असे एक ना अनेक अडचणीला कंठेहळळी गाव समोर जात असून लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी अशा प्रकारची मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा कंठेहळळी यांच्यावतीने आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट आगार व्यवस्थापक मदनीपाशा जुनेद यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसात जर बस सेवा सुरु नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्यावतीने कंठेहळळी ग्रामस्थांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिलामणी बनसोडे,युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष रवी पोटे,कंठेहळळी शाखा अध्यक्ष सैपन ताची,महा सचिव यशपाल शिंदे, सचिव लक्ष्मण शिंगे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!