ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी : राज्यात सहारा चळवळ !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी आतापासून मनसे देखील तयारीला लागली आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आयोजित तिसरी वार्षिक सहकार परिषद सध्या कर्जतमध्ये सुरू आहे. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी असे हे शिबिर होत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील सद्यस्थितीतील राजकारण, सहकार क्षेत्राबाबत परखड भाष्य केले.

“राज्यातील आत्ताची चळवळ ही सहारा चळवळ आहे. एकमेकांना सहारा देऊन सरकार चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रात 2 लाख 22 हजार सहकार संस्था आहेत. त्याच्या खालोखाल गुजरात आहे म्हणून महाराष्ट्रावर डोळा आहे. अमुलसाठी महानंदा डेरी गिळंकृत करायचे प्रयत्न चाललेत…” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

“पूर्वी लढून जमिनी घेत होते. युद्धामुळे कळायचं जमिनी घ्यायला आलेत. पण आता हे राजकारणी कधी जमिनी घेताहेत हे माहिती ही पडत नाही. आपल्या बाजूला काय होतंय ते समजून घ्या नाहीतर डोक्यावर हाथ मारून घ्यावं लागेल. राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण टाकला, तुम्ही टाकू नका, माझा महाराष्ट्र सैनिक कधीही स्वाभिमान गहाण टाकणार नाही..” असे आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केले. “महाराष्ट्राची चळवळ वाढली पाहिजे. ती तुम्ही वाढवा, आणि जी महाराष्ट्र उध्वस्त करणारी चळवळ उध्वस्त करून टाका. राज्यकर्ते मुंबईवरही हाथ घालतील. विदर्भाचा ही तुकडा पाडतील, हे ७० वर्षांपासून सुरू आहे. आपण जातीपाती साठी भांडातोय हे सर्व चालवलं जातंय.. अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!