मुंबई, दि.२८ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव हे कोरोनाबाधीत असून त्यांची प्रकृती काल गंभीर बनली होती. तर आज गुरुवारी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती सुधारणा होऊन स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे. राजीव सातव यांना पुण्यातुन मुंबईला हलविण्यात येणार होते मात्र आज राजीव सातव यांच्या प्रकृती स्थिर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजीव सातव यांनी सौम्य लक्षणे दिसल्याने त्यांनी २२ एप्रिल रोजी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्याची माहिती सातव यांनी ट्विट करून दिली होती. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.
जे आपले संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना सुरक्षे संदर्भात सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे. असे आवाहन राजीव सातव यांनी केले होते.