---Advertisement---

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

पंकजा मुंडे यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!