राजर्षी शाहू महाराजांच्या विचारसरणीतून राज्याची प्रगती
अक्कलकोट येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.२६ : राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपले अधिकार वापरले. त्यांनी समाजातील सर्व वर्गांना न्याय दिला. त्यांचीच विचारसरणी आज आत्मसात केली जात आहे. त्यामुळे राज्याची प्रगती देखील जलद गतीने होत आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.हन्नूर रोडवरील महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, गिरीजामाता प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी कार्य केले. आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वस्तीगृहाची निर्मिती करून सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली केली. अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहे. त्यांची ही कार्यपद्धती अवलंबल्यामुळे खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.यावेळी जेष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.खंडेराव घाटगे यांनी केले.तर आभार
सुरेश रूगे यांनी मानले.