ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करा; अक्कलकोट पालिकेतील कर्मचाऱ्यांबाबत नागरिकांचा सूर

अक्कलकोट : अक्कलकोट नगरपालिकेत वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे. सध्या याविषयी अक्कलकोटमध्ये चर्चेला ऊत आला आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून या बाबींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अक्कलकोट पालिका ब दर्जाची आहे अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता तर आहेच पण त्यात काही कर्मचारी व अधिकारी असे आहेत जे वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्यावर वचकच कुणाचा राहिला नाही. ना त्यांची बदली होते ना ते कुठे जाण्याच्या मनस्थितीत आहेत.

अक्कलकोटमध्येच ठाण मांडून बसल्याने त्यांच्याविषयीच्या तक्रारी शहरामध्ये वाढू लागल्या आहेत. सोशल मीडियावरती त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम चालवली जात आहे. अक्कलकोट शहरात ज्या ज्या वेळी मुख्याधिकारी आक्रमक भूमिकेत येतात. त्या त्यावेळी त्यांच्या भूमिकांना सुरुंग लागत असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीने अन्य खात्यामध्ये तीन वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात त्याच पद्धतीने नगरपालिकेमध्ये का होत नाही. त्या ठिकाणी देखील होणे गरजेचे आहे असे असताना अक्कलकोट नगरपालिकेत मात्र वर्षानुवर्षांपासून तेच कर्मचारी दिसत असल्याने विकास कामांवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. त्यात पुन्हा लोकलचे कर्मचारी जर असतील तर जास्त लागेबांधे निर्माण होऊन कामांना ब्रेक लागतो, अशी चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. याकडे आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष द्यावे, असा सूर शहरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 

अनेक वर्षांपासूनची मागणी

आमची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. वारंवार जर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पण बदल्या जर होत गेल्या तर जनतेची कामे पण वेळेवर होतील आणि विकास कामे पण मार्गी लागतील.याकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष द्यावे. याबाबत आम्ही सविस्तर निवेदन देणार आहोत – अविनाश मडीखांबे,रिपाई तालुकाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!