ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रिझर्व्ह बँकेची कारवाई, राज्यातील या बँकांना ठोठावला दंड

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

रिझर्व्ह बँकेने देशाच्या 5 सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली आहे. यात राज्यातील काही बँकांचा समावेश आहे. RBI ने मध्य प्रदेशातील मैहर येथील मां शारदा महिला नागरीक सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने प्रुडेंशियल इंटरबँक एकूण एक्सपोजर मर्यादा तसेच प्रुडेंशियल इंटरबँक प्रतिपक्ष एक्सपोजर मर्यादांचे उल्लंघन केले असल्याने बँकेवर दंडात्मक कारवाई झाली आहे.

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला 2.60 लाख रुपये, वैजापूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 7.50 लाख रुपये, प्रेरणा नागरी सहकारी बँक लिमिटेडला (औरंगाबाद) 2 लाख रुपये आणि श्री शिवेश्वर को. -ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वसमतला (हिंगोली) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी या सदर बँकांवर ही कारवाई झाली असून याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँकांना जो आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. त्या दंडाच्या रकमेची वसुली ही केवळ बँकांकडून वसूल केली जाणार आहे. ग्राहकांकडून कोणताचं दंड वसूल होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!