सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) सन २०२१ चा आज निकाल जाहीर होणार, विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली
मुंबई, दि. २ : शासन निर्णय क्र.परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एमडी-२ दि.०२/०७/२०२१ मध्ये निश्चित केलेली मूल्यमापन कार्यपद्धती तसेच मंडळाच्या दि.०५ जुलै २०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसास अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येईल
★ www.maharesult.nic.in
★ www.maharesult.nic.in
★ msbshse.co.in
★ hscresult.11thadmission.org.in
★ hscresult.mkcl.org
★ mahresult.nic.in