सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील निवृत्त प्राध्यापक एस. एस. मास्टर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सहकारी, कुटुंबिय, मित्र परिवार व विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पुण्यातील मांजरी येथील मिठानीन सभागृहात झालेल्या हृद्य कार्यक्रमात प्रा. मास्टर यांच्या बालमित्रांनी आठवणी जागून विपरित परिस्थितीत त्यांनी कसे शिक्षण घेतले याबाबत सांगितले. सहकारी प्राध्यापकांनी महाविद्यालयीन काळातील आठवणी जागवल्या. विद्यार्थ्यांनी प्रा. मास्टर यांच्या शिकवणीतून जीवनातील अनेक अवघड प्रसंगावर केलेली मात व आयुष्याच्या वळणावर प्रा. मास्टर हे दिशादर्शक असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. मास्टर यांनी आपल्या आयुष्यातील वळणांवर प्रकाश टाकत अक्कलकोटमधील जीवनावर भाष्य केले.
प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीकंठ मास्टर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. व्ही. बी. आगासे, प्रा. एस. एस. वाले, सी. ए. सुरेश पांढरे, सूर्यकांत बिराजदार, सूर्यवंशी, अभय दिवाणजी, सिद्धानंद कलशेट्टी, प्रा. मुल्ला, मल्लिकार्जून मुलगे, वैजयंती पवार-भोसले, सुरेखा सिरसट, प्रिया मास्टर यांची भाषणे झाली. प्रा. सतीश कुमदाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनिधी मास्टर, कल्याणी शरणार्थी, गुरुदेवी शरणार्थी, प्रेमिला मास्टर, श्रीधर मास्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.