राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चपळगावच्या रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलला ५ सुवर्ण आणि २ सिल्वर पदकांची कमाई
अक्कलकोट, दि.२७ : पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील मनिषा बहुउद्देशीय व ग्रामविकास सेवा संस्था संचलित रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश संपादन केले.शोतोकान कराटे स्पोर्ट असोसिएशन,पुणे यांच्यावतीने
ही स्पर्धा पार पडली.१० वर्षांखालील गटात व ८ वर्ष वयोगटात राज्यस्तरावर कराटे काता व फायटींग स्पर्धेत पाच सुवर्ण आणि दोन सिल्वर पदकांची कमाई केली.८ वर्षाखालील वयोगटात स्वरा भीमाशंकर सावळे हिने कराटेमध्ये काता व फायटींग स्पर्धेत असे दोन सुवर्ण पदक पटकाविले.११ वर्षांखालील वयोगटात माऊली खंडेराव कोरे (चप्पळगाव) कराटेमध्ये काता व फायटींग स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले.वैष्णवी नारायण राजगुरू ( हन्नूर) कराटेमध्ये काता व फायटींग स्पर्धेत असे दोन सिल्वर मेडल घेतले.११
वर्षांखालील वयोगटात अंकिता अण्णासाहेब जाधव कराटे(कुरनुर) काता स्पर्धेत एक सुवर्ण पदक मिळाले.यासंदर्भात बोलताना अध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात स्पोर्ट व योगा यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरहिरने भाग घेतला पाहिजे आणि आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवले पाहिजे.जीवनातील यश आणि
अपयश पचविण्याची ताकत ही खेळाच्या मैदानावर तयार होते.या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आदिनाथ येवते यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील,मुख्याध्यापक दिगंबर जगताप,संस्थेचे मार्गदर्शक के.बी पाटील व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.