ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी ! रोहित शर्मा निवृत्ती घेणार ?

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

मेलबर्न कसोटी सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. मिडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सिडनी टेस्टनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना हा रोहितचा शेवटचा सामना असू शकतो.3 जानेवारीपासून सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जर पूर्ण पाच दिवस चालला तर सात जानेवारी हा रोहित शर्माच्या कसोटी कारकि‍र्दीचा शेवटचा दिवस असू शकतो. याच दिवशी तो कसोटीमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार बीसीसीआयचे पदाधिकारी आणि टीम इंडियाच्या सिलेक्टरमध्ये देखील रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे रोहित शर्माकडून सिलेक्टरची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळे जर भारत फायनलमध्ये पोहोचला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. किंवा त्यापूर्वी सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी देखील रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशी बातमी आता समोर येत आहे.

 

मोठी बातमी म्हणजे भारताचा मेलबर्न टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर लगेचच रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. एक वेळ अशी होती की हा सामना ड्रॉ करण्याची संधी देखील टीम इंडियाकडे होती.टी ब्रेकपर्यंत टीम इंडियाचे केवळ तीनच गडी बाद झाले होते. मात्र त्यानंतर एक खराब शॉट खेळून ऋषभ पंत बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा खेळ पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. यशस्वी जैस्वाल वगळता एकाही खेळाडूला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही, त्याने 84 धावा फटकावल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!