पुर व अतिवृष्टीने नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटी निधी : आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात यावर्षी झालेल्या पावसाळ्याच्या शेवटी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती.परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले त्याने ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती.त्यामुळे या भागात प्रवास करताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.यावेळी खुप मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हरणा बोरी नदीला पुर आला त्यामुळे नदीकाठचे व अक्कलकोट विधानसभेतील रस्त्यांचे भरपूर नुकसान झालेले होते. त्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला त्यानुसार अक्कलकोट तालुक्यासाठी 12 कोटी रुपये तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 3 कोटी असे एकूण 15 कोटी मंजूर झालेले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया होवून त्यानंतर सदर कामास सुरवात होणार आहे असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.वागदरी गावाजवळ 02 कि.मी.,65 लाख, कोर्सेगावाजवळ 03 कि.मी, 80 लाख हन्नूर ते जिल्हा हद्द 02 कि.मी.80 लाख, दुधनी रेल्वेगेट ते निंबळ हद्दपर्यंत 04 कि.मी.90 लाख, बोरगाव देशमुख ते घोळसगाव 02 कि.मी.90 लाख, हिळ्ळी ते शेषगिरी हद्द 02 कि.मी.30 लाख,बोरेगावजवळ 01 कि.मी., अरळी ते दर्शनाळ 03 कि.मी., दर्शनाळ पुलाचे रोलिंग दुरुस्ती,हन्नूर ते चुंगी 03 कि.मी. 2 कोटी, भुरीकवठे ते गोगाव ते खैराट 05 कि.मी.65 लाख, करजगी घुंगरेगाव 13 कि.मी.90 लाख, आळगे ते शेगाव 05 कि.मी.1 कोटी 10 लाख, मुंढेवाडी ते अंकलगे 08 कि.मी.110 लाख, पानमंगरुळ ते देवीकवठे 05 कि.मी.50 लाख, तिर्थ ते चपळगाव 04 कि.मी.90 लाख, तसेच इब्राहिमपूर गावाजवळ सी.डी. वर्क दुरुस्ती करणे 15 लाख आणि निमगाव जवळील बोरी नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे 15 लाख. त्यासोबतच कुंभारी ते होटगी 3.5 कि.मी.1कोटी, दर्गनहळ्ळी ते कुंभारी 3.5 कि.मी.1 कोटी 4 लाख कुंभारी ते कर्देहळ्ळी 01 कि.मी.54 लाख शिंगडगाव ते वळसंग 02 कि.मी. 60 लाख, मुळेगाव ते दर्गनहळ्ळी 2.8 कि.मी. 70 लाख, आदी रस्त्यांचा समावेश आहे.या सर्व रस्त्यांचे काम मार्गी लागल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.