ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.सचिन कल्याणशेट्टी यांचा हेरिटेज मनिधारीतर्फे सत्कार !

सोलापूर ; प्रतिनिधी

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे देण्यास पुढाकार घेतल्याबद्दल व इतर कामे केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार श्री.सचिनदादा कलशेट्टी यांचा सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी एम्पायरमधील कार्यकर्त्यांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीचे निमित्त साधून अक्कलकोट येथे आ.कल्याणशेट्टी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. शाल, पुष्पहार,फरची टोपी, भेटवस्तू व मिठाई देवून आ.कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी श्री सिद्धेश्वर महाराज की जय,श्री स्वामी समर्थ महाराज जय या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. या कार्यक्रमास सर्वश्री सुरेश येळमेली,शंकर गाडी,गजानन होनराव,अप्पू बिराजदार, अशोक बिराजदार,चनप्पा बिराजदार,विजयकुमार निरोळे,राजकुमार कलशेट्टी,संतोष स्वामी, श्रीशैल घुली,तुकाराम बंदीछोडे, अनिल कलशेट्टी,राघवेंद्र गजेली,सिद्धेश्वर श्रीगादी,सचिन आमाने, शिवय्या मसुती, मल्लिनाथ कोरे, शिवप्रसाद स्वामी, जगदीश मरबे, मल्लिनाथ खुने,संतोष आष्टगी,निर्मल आगरखेड,शिवानंद मुनोळी,शरण निंबाळे व रविकुमार दासरी तसेच रामु पाटील आदी उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतीले यांनी केले.अनेक कार्यकर्त्यांनी हेरिटेज मनिधारी सोसायटीतील विविध विकास कामांसाठी आमदारांना साकडे घातले.त्यावेळी आ.कल्याणशेट्टी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.सर्व कार्यकर्त्यांनी आ.कल्याणशेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!