ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डीपफेकचा बळी ठरला सचिन तेंडुलकर

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही डीपफेकचा बळी ठरला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ‘स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट’ या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करताना दिसत आहे.

सचिनने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे, असे लिहिले आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. त्याने या संदेशासह भारत सरकार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांना टॅग केले आहे. या बनावट व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की, “माझी मुलगी यावेळी एविएटर ही गेम खेळतेय, ज्याविषयी प्रत्येकजण सध्या बोलतोय. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट अ‍ॅप खेळून दररोज एक लाख ८० हजार रुपये कमावते.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!