ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा किती जास्त पेन्शन ?

मुंबई वृत्तसंस्था 

सध्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. 90 च्या दशकात मुंबई क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी हिट होती. दोघांनी एकत्र शिक्षणासह एकत्र क्रिकेट खेळले. टीम इंडियाकडून दोघे एकत्र खेळले. त्यावेळी दोघे करिअरमध्ये उंची गाठवणार असं जाणकरांना वाटत होतं. पण सुरुवात जशी झाली, करिअरचा शेवट तसा नव्हता. सचिन या शर्यतीत खूप पुढे निघून गेला. 21 व्या शतकात पाऊल ठेवण्याआधीच विनोद कांबळीची गाडी अडखळली. सचिन तेंडुलकरनंतर एक वर्षाने विनोद कांबळीने डेब्यु केला. कांबळी 2000 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रिटायरमेंटनंतर दोघांना सचिन आणि कांबळीला BCCI कडून पेंशन मिळते. दोघांना मिळणाऱ्या पेंशनच्या रक्कमेमध्ये सुद्धा फरक आहे.

सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीच्या तुलनेत जास्त पेंशनची रक्कम मिळते. BCCI कडून दर महिन्याला दोघांना जी पेंशन मिळते, त्यात 20 हजार रुपयांचा फरक आहे. सरळ शब्दात सचिनला कांबळीपेक्षा दरमहिन्याला 20 हजार रुपये जास्त मिळतात.

एका रिपोर्ट्नुसार सचिन तेंडुलकरला दर महिन्याला BCCI कडून पेंशनची जी रक्कम मिळते, ती 50 हजार रुपये आहे. विनोद कांबळीला दर महिन्याला बीसीसीआयलकडून 30 हजार रुपये मिळतात. सध्या कांबळीची स्थिती पाहिल्यास बीसीसीआयकडून मिळणारी ही रक्कम कांबळीसाठी खूप मोठी आहे. कारण तेच त्याच्या उत्पन्नाच साधन आहे. सचिन तेंडुलकर पेंशनशिवाय 1400 कोटीच्या संपत्तीचा मालक सुद्धा आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात मोठा फरक आहे. विनोद कांबळी फक्त 9 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तेच सचिन तेंडुलकर दोन दशकापेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळला. विनोद कांबळी भारतासाठी 17 टेस्ट आणि 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 3500 पेक्षा जास्त धावा केल्या. सचिन तेंडुलकर भारतासाठी 200 टेस्ट, 463 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळला. सचिनने एकूण मिळून 34357 धावा केल्या. यात 100 सेंच्युरी आहेत. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या क्रिकेटमध्ये जितकं अंतर आहे, तितकच ते त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये सुद्धा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!