ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सलगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काशिनाथ कुंभार,निवडीनंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार

 

अक्कलकोट, दि.५ : अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सलगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उपसरपंचपदी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक काशिनाथ कुंभार यांची निवड झाली.गुरुवारी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांना १३ पैकी ८ मते मिळाली.निवडीनंतर एकच जल्लोष
करण्यात आला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जय हनुमान ग्राम विकास पॅनलला १३ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या.ह्याच पॅनलमधून सरपंच ज्योती डोंगराजे ह्या ४०९ मतांनी विजयी झाल्या आहेत.या निवडणुकीत विरोधी रुपाली बोरगाव यांचा पराभव झाला होता.विरोधी सलगर ग्राम विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या.उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पार्वती पाटील विरुद्ध काशिनाथ कुंभार अशी लढत झाली.
यात कुंभार यांना ८ मते मिळाले.निवडणूक अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश मुरुमकर यांनी काम पाहिले.तर त्यांना ग्रामसेवक प्रदीप तोरसकर,
तलाठी पांढरे यांचे सहकार्य लाभले.
दुपारी ३ वाजता ही निवड जाहीर करण्यात आली.निवडीनंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते सरपंच डोंगराजे,उपसरपंच कुंभार व अन्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यापुढे निवडणुकीतील मतभेद विसरून गावचा विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच कुंभार यांनी सांगितले.यावेळी नूतन ग्रा.पं सदस्य निकिता दसाडे,चंदव्वा शेळके,गुंडमा कोळी,यशोदा चव्हाण,समरिन बिराजदार,महानंदा पोतेनबाद यांच्यासह चंद्रकांत कालीबत्ते,मल्लिनाथ भासगी,इमाम लालखा,आणप्पा संगोळगी,रमेश डोंगराजे,इकबाल बिराजदार,सातलींग गुंडरगी,प्रवीण शटगार,भीमाशंकर जमादार,विजयकुमार डोंगराजे,रफिक पटेल,साहेबलाल लालखा,सिद्रामप्पा शेळके आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!