---Advertisement---

रुद्देवाडीच्या उपसरपंचपदी यशवंत शेरी यांची बिनविरोध निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.५: तालुक्यातील रुद्देवाडी ग्रामपंचायतीकरिता गुरुवारी उपसरपंच पदाकरिता सरपंच तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भुताळसिध्देश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून यशवंत यल्लप्पा शेरी यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी जाहीर केले. ग्रामसेवक श्रीशैल कणगी यांनी याकामी सहकार्य केले.
नूतन उपसरपंच यशवंत शेरी यांनी बोलताना म्हणाले, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रुद्देवाडीच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच तुकाराम पाटील, उपसरपंच यशवंत शेरी, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पाटील, सुस्मिता शाखापुरे, लक्ष्मीबाई शिंगे आदीजण उपस्थित होते.
उपसरपंचपदी यशवंत शेरी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच तुकाराम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करुन पेढ भरविण्यात आले. याप्रसंगी रुद्देवाडी सोसायटीचे चेअरमन अरविंद ममनाबाद, माजी चेअरमन महादेव पाटील, इरय्या स्वामी, मल्लिनाथ झळकी, हणमंत बिराजदार, बापुराव देसाई, जगदेव पाटील, दारेश्वर बिराजदार, प्रकाश पाटील, रमेश बिराजदार, नागप्पा देसाई, श्रीशैल सपळी, भुताळी शिंगे, राजकुमार बिराजदार, श्रीशैल शाखापुरे, तुकाराम पुजारी, बसवराज पाटील, श्रीशैल पाटील, यल्लप्पा शाखापुरे, संतोष पाटील, दावलमलिक पाटील, बाबुराव पाटील, प्रशांत पाटील, यल्लप्पा पुजारी, बैलप्पा पुजारी, लक्ष्मण शेरी, गंगाराम शाखापुरे, माळप्पा पुजारी, शिवराया पुजारी, सदाशिव पुजारी, आमसिध्द पुजारी, हणमंत जमादार, हुवण्णा पुजारी, गंगाराम हिरोळी, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!