ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समर्थनगर येथे धार्मिक कार्यक्रम; भक्ती केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही ; ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज यांचे प्रतिपादन

अक्कलकोट, दि.१८ : भक्ती केल्याशिवाय
ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानाने परमेश्वर कळतो तर भक्तीने देवाला पकडता येते म्हणून परमेश्वराचे सतत चिंतन आवश्यक आहे,असे ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज कानेगावकर यांनी निरूपण करताना सांगितले.श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त समर्थ नगर (ता.अक्कलकोट)
येथील श्री स्वामी समर्थ विसावा पादुकास्थानी भजन,प्रवचनाच्या कार्यक्रमांचा लाभ सर्व समर्थ नगरवासीयांनी घेतला.काल गुरुवर्य ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज कानेगावकर यांची सुश्राव्य प्रवचन सेवा संपन्न झाली. यावेळी त्यांनी प्रवचन केले.महाराजांनी आपल्या मधुर वाणीतून सर्व भाविक-भक्तांना ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील पहिली ओवी “तरी अवधान एकले दीजे। मग सर्व सुखाशी पात्र होइजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे।उघड ऐका।।१।।” या ओवीवर सर्व भाविकांचे चिंतन-मनन घडवून आणले. महाराजांनी संसार म्हणजे काय? संसाराला दुःखमय का म्हणतात?संसारात सुखप्राप्तीसाठी काय करावे? संसाराकडून परमार्थकडे वाटचाल करत असताना आपण आपल्या संसारी जर परमार्थाचे अधिष्ठान ठेवले तर तो संसार सुद्धा परमार्थ होतो असे ठणकावून सांगितले त्याचबरोबर परमार्थाचे ढोंग घेऊन केलेला परमार्थ शेवटी संसारच होतो याची ही जाग दिली. शेवटी ईश्वराचे स्वरूप कसे आहे,यावर बोलताना महाराज म्हणाले,परमात्मा निर्गुण,निराकार आहे. भक्तीची सुरुवात ईश्वर आकारापासून होते तर शेवट निराकार ईश्वर स्वरूप जाणूनच होतो. ईश्वरभक्ती ही नित्य जीवनाचा भाग बनावी हा उपदेश दिला.यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. गेले तीन-चार दिवस भजन प्रवचन कीर्तन सेवा पार पडली.या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या उत्सवासाठी शिवशरण जोजन,प्रा.श्रीकांत जिड्डीमनी,रुद्राक्ष वैरागकर,सुधाकर काळे,धुळप्‍पा बजे,गोपाळराव कोटणीस,प्याटी गुरुजी आदींसह समर्थनगर ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

दिवसभर
महाप्रसादाची सोय

पुण्यतिथी दिवशी विसावा कट्टा येथे भव्य मंडप उभारून परिसरातील नागरिकांना मंडळातर्फे दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आले. याचा लाभ भाविकांनी घेतला. उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांनी मंडळाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!