समर्थनगर पाणीपुरवठा योजनेचे नव्या वर्षात लोकार्पण; समर्थनगरमध्ये खासदार निधीतील विविध कामांचे झाले भूमिपूजन
अक्कलकोट, दि.२० : समर्थ नगर
ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न मोठा होता तो आता मार्गी लागला असून या नव्या वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागून त्याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडेल,अशी ग्वाही खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.सोमवारी,खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना खासदार महास्वामी म्हणाले की, यापूर्वी समर्थनगर ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आजही अनेक कामांचे भूमिपूजन झाले. पुढच्या काळातही उर्वरित कामांना निधी देण्याची ग्वाही दिली.येत्या जानेवारी महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा करणार आहेत हा मुहूर्त चांगला असल्याने त्याच मुहूर्तावर पाणीपुरवठा योजना लवकर पण व्हावा अशी माझी इच्छा आहे,असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी बोलताना माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले की,महास्वामी यांनी ज्या ज्या वेळी शब्द दिला त्या त्यावेळी निधी देण्याचा प्रयत्न केला आहे मंजूर झालेली सर्व कामे हे येत्या दोन महिन्यात पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा महास्वामीजींच्या हस्ते केला जाईल
तसेच सध्या समर्थ नगर पाणीपुरवठा योजनेचे
काम प्रगतीपथावर असुन महास्वामीजींच्या इच्छेप्रमाणे हे काम आपण जानेवारी महिन्यात पूर्ण करून पाण्याचा प्रश्न
मार्गी लावू,अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी जेऊर रोड ते घिवारे घर रस्ता काँक्रीटकरण ,प्रियदर्शनी सोसायटी रस्ता, जेऊर रोड ते मालगम पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे,श्रीराम नगर येथे काँक्रीट रस्ता ,जेऊर रोड ते धनशेट्टी घर काँक्रीट रस्ता
करणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे सर्व कामे खासदार निधीतून मंजूर करण्यात आली आहेत.या कार्यक्रमास उपसरपंच लालसिंग राठोड,ग्रा.प सदस्य रोहिदास राठोड,मोनेश्वर नरेगल,सतीश खराडे,योगीराज हिरेमठ ग्रामसेवक प्रेमदास पवार,संदीप बजे,
सचिन गिरबोणे,मळसिद्ध हारके,ए.बी चिक्कमणूर,दत्ता माशाळे, सिद्राम कोळी,एस.आर. गंदगे,जगदीश सौदी,शिवशंकर प्याटी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षभरात समर्थनगरचा
कायापालट
या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणखीनही काही कामे प्रस्तावित आहेत.मंजूर झालेली सर्व कामे दर्जेदार तर होतीलच शिवाय ती लवकरच पूर्ण केले जातील. वर्षभरात समर्थ नगरचा कायापालट झालेला दिसेल.
रोहिदास राठोड,ग्रा. पं सदस्य