अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका शाखा अक्कलकोटच्यावतीने देण्यात येणारे तालुकास्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार अकरा जणांना जाहीर झाले आहेत. त्यांचा सत्कार मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी साडे दहा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ ,हार, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व श्यामची आई पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी तर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी भोसले विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते वितरण होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी सचिन जगताप, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, प्राचार्य नंदकुमार कदम, जिल्हा कथामालेचे सुनील पुजारी, अशोक म्हमाणे, अशोक खानापुरे, तालुकाध्यक्ष परमेश्वर व्हसुरे आदी उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना रमेश येणगुरे ,मल्लिनाथ पाटील, सुरेश पिरगोंडे, खादीरबाशा शेख, वाहिद पटेल ,फारुख शेख, सचिन गडसिंग, शिवप्पा साखरे, राजशेखर विजापुरे ,श्रीशैल म्हमाणे या समितीच्या सदस्यांनी पुरस्कर्त्यांची निवड केली. पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवानंद बिराजदार (श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला करजगी),मलकप्पा भरमशेट्टी ( सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अक्कलकोट),अरविंद शिंदे (शहाजी प्रशाला अक्कलकोट) ,कस्तुरचंद आळंद(श्री शिवचलेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज मैंदर्गी),ज्ञानेश्वर कदम (ग्रामीण विद्या विकास प्रशाला चपळगाव),मासुलदार कासिम (बोरोटी आश्रम शाळा बोरोटी), विनायक राठोड (श्री शावरसिद्ध लायव्वादेवी प्रशाला आळगे), भाग्यकांत कल्याणी (विद्या विजय प्रशाला बोरगाव.दे.) ,वर्षाराणी हाताळी (सी.बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट) ,शुभांगी गडसिंग (लायन्स प्राथमिक शाळा अक्कलकोट) ललिता लवटे (सी.बी खेडगी महाविद्यालय). अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक व साने गुरुजी प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन समितीवतीने करण्यात आले आहे.