ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोबत संजय देशमुख यांनी व्हिडिओ कान्फ्रेंसिंगव्दारे संवाद साधला

अक्कलकोट – अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य समस्या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत व्हिडिओ कान्फ्रेंसिंग व्दारे रविवारी संवाद साधला.

अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विषयक चर्चे साठी रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कान्फ्रेंसिंगव्दारे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या सोबत चर्चा केली त्यावेळी संजय देशमुख अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विषयक समस्या सागुंन अक्कलकोट शहरातील ट्रामासेटंर लवकरात लवकर पुर्ण करण्याचे अधिका-याना आदेश द्यावे,नविन शंभर बेडचे ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटरयुक्त कोविडसेटंर मंजूर करावे,ग्रामीण रुग्णालय येथे पॅरामेडिकल स्टाॅप व डाॅक्टरांची नेमणूक करावे,डिजीटल एक्स्रेमशीन व टेक्निशियनची नेमणूक करावे,अत्याधुनिक एम्बुलेंस मंजूर करावे,अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेटंर चालु करावे. अक्कलकोट तालुक्यासाठी लवकरात लवकर ऑक्सिजन निर्माती प्लाॅटं सुरू करावे,अक्कलकोट तालुक्यासाठी ज्यास्तीत ज्यास्त लसीचा पुरवठा व्हावा,असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे संजय देशमुख यानी मागणी केली,

लवकरात लवकर आरोग्यविषयक सर्व मागण्या पुर्ण होतील असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले अक्कलकोट तालुक्यासाठी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य समीती बनवण्यात आली असुन हि समीती आरोग्यविषयक मदत कक्ष उभारून जनतेच्या समस्येचे निवारण करेल असे संजय देशमुख म्हणाले. यावेळी ग्रामीण रुग्णालय सदस्य बसवराज बिराजदार, शहरप्रमुख योगेश पवार, तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर, प्रविण घाटगे, सैपन पटेल, आनंद बुक्कानुरे ,उद्योजक महिबुब शेख, रजाक सय्यद, सुरेश डिग्गे, तेजस झुंजे, राहुल चव्हाण, खंडु कलाल, उमाकांत साळुंके, युवासेना शहरप्रमुख विनोद मदने,तालुका महिला संघटक वर्षा चव्हाण, शहर संघटक वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुभांर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!