ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ॲड.सर्जेराव जाधव यांच्या सारखी माणसे समाजात दुर्मिळ : डॉ.बिराजदार ;पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अक्कलकोट, दि.४ : आजच्या जगात ॲड.सर्जेराव जाधव यांच्या सारखी माणसे मिळणे दुर्मिळ आहे.त्यांच्या नावे उभी असलेली संस्था हजारो संस्थांना प्रेरणादायी आहे,असे गौरवोद्गार प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी काढले.ॲड.जाधव यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शिबिर तसेच गोरगरिबांना मदतीच्या धनादेशाचे वाटप
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना प्रा. बिराजदार म्हणाले,अशा प्रकारचे कार्य समाजात होणे म्हणजे ही
दैवी शक्ती आहे. ते जरी शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपल्या सर्वांना आदर्श घेण्यासारखे आहे.त्यांचे स्मरण सतत कार्यरूपी तालुक्यातील जनतेला होत
राहील.अध्यक्षीय भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.
शरद फुटाणे यांनी सर्जेराव जाधव यांनी घालून दिलेल्या आचार संहिते प्रमाणे संस्थेचे कार्य सुरू असल्याचे नमूद केले. फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फत्तेसिंह संस्था आणि सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या कार्याचा गौरव केला
आणि जाधव यांच्या विशेष आठवणींना
उजाळा दिला.यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय विश्वस्त संतोष फुटाणे (जाधव)यांनी करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यकारी विश्वस्त सुरेश फडतरे यांनी केले.प्रारंभी तालुक्यातील विविध मान्यवर,संस्थांच्यावतीने जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वस्त शंकरराव पवार यांनी केले तर आभार विश्वस्त मोहनराव चव्हाण यांनी मानले.या कार्यक्रमास फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव,माधुरी जाधव,ताराबाई हांडे, तानाजीराव चव्हाण,अमर शिंदे,सुधाकर गोंडाळ, शिवाजीराव पाटील एडवोकेट सुरेशचंद्र सूर्यवंशी, के.बी पाटील, आंबणप्पा भंगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्र शिबिरात ८०
जणांची तपासणी

दरवर्षी पुण्यतिथीच्या निमित्ताने नेत्रचिकित्सा
व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी डॉ.अनुराधा अवस्थी आणि डॉ. वीरेंद्र अवस्थी यांनी ८० जणांची नेत्र तपासणी केली. यात ४० जणांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली.यासाठी राजू मलंग,नीलकंठ कापसे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!