ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिला साक्षरतेचे महत्व पटवून दिले – महेश इंगळे

अक्कलकोट, दि. ३ : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मपत्नी होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे होते. सावित्री बाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी १८४० मध्ये झाला. सावित्रीबाई फुले शिक्षण जगतात स्मरणात आहेत. कारण सावित्रीबाई फुले अशा स्त्री होत्या ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि स्त्रियांना शिक्षित करण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले या कवयित्री, शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. येथील स्विमिंग ग्रुप व महेश इंगळे मित्र परिवाराच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना,  इंगळे यांनी ज्यावेळी भारतात महिलांना शिक्षण देणे महत्त्वाचे मानले जात नव्हते, चूल आणि मूल इतकेच तिचे मर्यादित जीवन होते. जर एखादी मुलगी त्याकाळी शिक्षणासाठी पुढाकार घेतली असता तिचा विरोध होऊन मानसिक छळ व्हायचा. तसा सावित्रीबाई फुले यांचाही झाला, पण धीरोदात्त धैर्याने त्यांनी समाज मनाच्या संकुचित विचार श्रेणीस फाटा देऊन शिक्षण घेतले व भारतातील पहिल्या महिला शिक्षीका मुख्याध्यापिकेचा मान मिळविला व स्त्री शिक्षणा करिता लढा देऊन नारी जीवनात शिक्षणाचे महत्व पटवून देऊन समाजा समोर महिला साक्षरतेचा मापदंड आखून दिला. त्यामुळे आज भारतातील अनेक महिला विविध क्षेत्रात पुरुषांबरोबर मोठ्या पदावर कार्यरत आहेत, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नालाच जाते असे स्पष्ट करून त्यानिमित्त स्विमिंग ग्रुप च्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आल्याचे प्रतिपादन महेश इंगळे यांनी केले.

यावेळी स्विमिंग ग्रुपचे सदस्य महाराष्ट्र माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, प्रकाश दाजी शिंदे, सचिन किरहळ्ळी, अरविंद पाटील, शैलेश राठोड, प्रशांत लोकापुरे, अशोक कलशेट्टी, सुरेश गायकवाड, सुमित कल्याणी, दौलाप्पा सलगरे, हनुमंत माळी, अथर्व शिंदे, विश्वनाथ प्याटी, शरणू माशाळे, मल्लिनाथ मामा माळी, राजू एकबोटे, श्रीकांत झिपरे, आदी उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!