बंगळुरु : कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाब विरुद्ध भगवी शालवाद आणखीनच चिघळताना दिसत आहे. शिवमोग्गा येथील एका महाविद्यालयात मंगळवारी सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकातील वादाचे पडसाद राज्यात उमटले आहेत. फारुखी लुखमान नावाच्या विद्यार्थी नेत्याने ‘पहले हिजाब, फिर किताब’ असे बॅनर बीड शहरात लावले आहेत. मालेगा वात हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेने मोर्चा काढला, तर मुंबईत काही मुस्लिम संघटनांनी स्वाक्षरी मोहीम राबवलं.
जानेवारीमध्ये कर्नाटकातील उडुपी जिह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील ज्युनिअर कॉलेजमधील सहा विद्यार्थि नींर्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर राज्यातील विविध जिह्यांमध्ये वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचू लागले. त्यानंतर हा वाद अधिकच वाढू लागला आहे. मंगळवारी कर्नाटकमधील काही जिह्यांत हिजाब बंदीचा विरोध आणि समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी आमने-सामने येत निदर्शने केली. ड्रेसकोडमुळे शैक्षणिक संस्थांमधील वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असल्याने शाळा – महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री बोम्माई यांनी ट्विट करत जाहीर केला.
कर्नाटक हायकोर्टात हिजाबच्या वादावर सुनावणी सुरू असताना विविध जिह्यांत विद्यार्थ्यांनी महाविद्यालया बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. बागलकोटमध्ये आंदोलना दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. दरम्यान, शिमोगा येथेही दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर या ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सध्या यापरिसरात तणावपूर्ण शांतता आहे.