नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने शंभरी पार केल्याने जनता हैराण झालेली असताना सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर दरात तब्बल 25.50 पैशांनी महागले आहे. तर कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 84 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
देशातील विविध शहरात आजपासूनच नव्या किमती लागू झाल्या आहेत. 2021 मध्ये घरगुती गॅसच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. जानेवारी सोडता जवळपास सर्वच महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. 4 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपयांनी वाढ झाली होती. तसेच 1 मार्च रोजी गॅस सिलिंडरचा दर पुन्हा एकदा 25 रुपयांनी वाढविण्यात आला. त्यानंतर एप्रिलमध्ये 10 रुपयांनी किमती कमी करण्यात आल्या होत्या.
जूनमध्ये 19.2 कीलो कमर्शिअल सिलेंडरचे दर एकशे बावीस रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यानंतर कमर्शियल सिलेंडरचे दर 1473.50 पैसे इतका होता. तर जूनमध्ये घरगुती सिलेंडरचा दर जैसे थे होता. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.