ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याने अकोल्यात उसळली दंगल !

अकोला : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असतांना अशाच ठिकाणी पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याच्या‎ संशयावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हा तरूण येथे ‎साेमवारी दाेन गटात दंगल उसळली. दाेन्ही गट‎एकाच समुदायाचे आहेत. अकाेल्यातून गेलेल्या ‎हल्लेखाेरांची कार जमावाने पेटवली. हाणामारीत‎तलवारींचा वापर करण्यात आला असून, सहा‎जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची‎प्रकृती चिंताजनक अाहे. या घटनेमुळे परिसरात‎काही वेळ तणाव निर्माण झाला हाेता.

हा तरूण परिसरात जनावरांची अवैध वाहतूक, अमली‎पदार्थांची तस्करी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे‎ पंचक्राेशीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच अवैध‎धंद्यांवरून अनेकदा वादही झाले आहेत. अनेकांवर‎गुन्हे दाखल झाले. काही दिवसांपूर्वीही अवैध‎धंद्यांवर कारवाई झाली. दरम्यान १७ फेब्रुवारी राेजी‎अंमली पदार्थ तस्करीतील आराेपी शेख जुनेद शेख‎व त्याच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या गटावर हल्ला केला.‎दुसऱ्या गटातील काही आपल्याविषयीची पोलिसांना‎माहिती देत असल्याचा संशय जुनेदच्या गटाला‎होता. यातूनच वाद पेटला व हाणामारी झाली.‎

दुपारी हातरूणमध्ये दाेन्ही गट‎एकमेकांसमोर उभे ठाकले. अमली‎पदार्थांची तस्करी करणाऱ्या गटातील‎कार जाळण्यात आली. हल्लेखाेरांना‎आरोपीने अकाेल्यातून बाेलावल्याचे‎समजते. ही घटना मिरवणूक मार्गावरील‎परिसरात घडली. अमली पदार्थाची‎विक्री करणाऱ्या गटाकडून विरुद्ध‎बाजूच्या गटावर हल्ला चढवण्यात‎आला. यात सहा जण जखमी झाले.‎जखमींना तातडीने सर्वाेपचार‎रुग्णालयात भरती करण्यात आले.‎घटनेनंतर पेटती कार विझवण्यात आली.‎मात्र आगीत कारचे प्रचंड नुकसान झाले.‎ सुमारे १० हजार लोकसंख्या‎असलेल्या हातरूण गावात‎किराणा, हार्डवेअर, टेलरींग,‎हाॅटेल, जनरल स्टाेअर्स,‎चहाची दुकाने आहेत. घटना‎घडल्यानंतर परिसरातील ही‎दुकाने बंद झाली. मुख्य‎रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ‎कमी झाली. घटनेची माहिती‎मिळताच उपविभागीय पोलिस‎अधिकारी गजानन पडघन,‎उरळ पोलिसांनी गावात धाव‎घेतली. दंगल नियंत्रण पथकही‎हाेते.‎

घटनेची माहिती मिळताच‎ स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख‎शंकर शेळके व त्यांच्या पथकाने‎घटनास्थळ गाठले. यावेळी‎त्यांनी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार‎शेख जुनेद शेख याच्यासह पाच‎जणांना ताब्यात घेतले. तर उरळ‎पोलिसांनी तिघांना ताब्यात‎घेतले. ताब्यात घेतलेल्या‎संशयितांपैकी एकाने उरळचे‎तत्कालीन ठाणेदार बुधवंत‎यांच्यावरही हल्ला केला होता,‎अशी माहिती पोलिसांनी दिली‎आहे.‎

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!