ध्यास विश्वसार्ह बातमीचा

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा : छत्रपती संभाजीनगरात अडीच हजार रोहिंग्यांचे वास्तव्य !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून देशभर गाजत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा आता थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, तर संभाजीनगर शहरात 2 हजार 448 तर सर्वाधिक 4 हजार 730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

शुक्रवारी माजी खा. सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. सोमय्या म्हणाले की, २०२४ मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लक्ष घालण्यास सांगितल्याचे सोमय्या म्हणाले.

मालेगावात घुसखाेर बांगलादेशी, राेहिंग्या यांनी जन्माचा दाखला मिळवण्यासाठी खाेटी कागदपत्रे सादर केली आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. त्यांनी शुक्रवारी बनवेगिरी करून दाखले घेणाऱ्या ११० जणांची यादी छावणी पाेलिसांकडे दिली. सरकारी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्या या घुसखाेरांवर गुन्हे दाखल करावेत, असा तक्रार अर्जही दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!