ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : आधी महिलेचा नंतर आता आढळला अडीच वर्षीय मुलाचा मृतदेह !

पैठण : वृत्तसंस्था

राज्यातील पैठण येथील नाथ सागर धरणामध्ये पंप हाऊसच्या परिसरात तीन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा दगडाने बांधलेला मृतदेह पाण्यात आढळून आला होता. त्यानंतर आज (दि.३) सकाळी नाथ सागर धरण साखळी क्रमांक 42 परिसरात एका अडीच वर्षीय मुलाचे बांधलेले प्रेत आढळून आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, नाथसागर धरण साखळी क्रमांक 42 परिसरात एका अनोळखी अडीच वर्षाच्या मुलाचा कापडात बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे प्रमुख गणेश खरडकर यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना दिली. पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पथकासह घटनास्थळ दाखल झाले असून तीन दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जालना पंप हाऊस लगत एका अनोळखी महिलेचा बेडशीट मध्ये बांधून कमरेला दगड बांधलेला मृतदेह आढळून आला होता.

या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह येथे आणून टाकल्याचा अंदाज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी व्यक्त करून तपास सुरू केला होता. दरम्यान, आज कापडात बांधलेले व अंगावर निळा रंगाचे टी-शर्ट असलेल्या अडीच वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यामुळे या महिलेचा या मुलाशी काही संबंध आहे का? या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, संभाजी झिंजुर्डे वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!