ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेवणाचे डबे देऊन केली कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची सेवा

विसर्जन मिरवणुकीत लायन्स क्लबने जोपासली सामाजिक बांधिलकी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

,दि.१९ : लायन्स क्लब अक्कलकोटकडून गणेश उत्सव काळात बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस बांधवांना जेवणाचे डबे फुड पॅकेट देऊन पोलिसांप्रति सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

अनंत चतुर्थीच्या दिवशी आलेल्या १६० पोलीस बांधवांना जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते व लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी ,सचिव सुधीर माळशेट्टी,उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार,पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी लायन्सचे सचिव सुधीर माळशेट्टी यांनी या उपक्रमा बद्दल सविस्तर माहिती दिली . बंदोबस्तासाठी आलेल्या स्थानिक व परगावी पोलीस बांधवांना पॉईंटवर आहे त्या ठिकाणी सर्व पोलीस बांधवांना त्या ठिकाणी जाऊन जेवणाचे डबे देण्यात आले.सदर कार्यक्रमास खजिनदार डॉ. सुनील बिरादार, डॉ.प्रदीप घिवारे, मल्लिनाथ साखरे ,शिरीष पंडित ,सुभाष गडसिंग, प्रभाकर मजगे ,शदीद वळसंकर, कल्याणी आळगी, महिबूब सलगरकर आदी पदाधिकारी व पोलीस
बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!