ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोटरी क्लबचे सेवा कार्य जगात सर्वश्रेष्ठ : डॉ.मेतन

अक्कलकोट रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

रोटरीमुळे जग जवळ आले आहे.रोटरीमुळे आपल्याकडील विद्यार्थी परदेशात जाऊन कमी खर्चात शिक्षण घेऊ शकतात.ही संस्था तब्बल २६५ देशांमध्ये
सेवा कार्य करत आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात एखादा फोन जगात कुठेही केला तर मदत मिळू शकते आणि त्या समस्येचे निराकरण पंधरा ते वीस
मिनिटात होऊ शकते,असे गौरवोद्गगार माजी प्रांतपाल डॉ.व्यंकटेश मेतन यांनी काढले.रविवारी सायंकाळी येथील फोर पेटल्स हॉटेलच्या हॉलमध्ये अक्कलकोट
रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. विपुल शहा व सचिव म्हणून डॉ. प्रशांत वाली यांनी पदभार घेतला.पुढे बोलताना डॉ.मेतन म्हणाले,रोटरीने
महिलांच्या सबलीकरणासाठी मोठे काम केले आहे. पर्यावरण निसर्ग संवर्धन याबाबतीतही वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचे काम रोटरीच्या माध्यमातून जगभरात केले जात आहे.उपप्रांतपाल सुहास लाहोटी यांनी अक्कलकोट रोटरी क्लबच्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक केले व यावर्षी पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन क्लबला दिले.रोटरीची जादू ही यावर्षीची थीम आहे.रोटरीच्या सेव्हन फोकस एरियाप्रमाणे यावर्षी आम्ही चांगले काम करणार आहोत,असे अध्यक्ष डॉ.शहा यांनी सांगितले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ.मेतन यांनी अध्यक्ष व सचिव यांना रोटरीच्या गोपनीयतेची व कार्य प्रणालीबाबतची शपथ दिली.यावेळी महिला सबलीकरण अंतर्गत
तीन गरीब महिलांना रोटरीतर्फे पिठाच्या गिरणीचे संच मोफत देण्यात आले.त्याशिवाय मागच्या वर्षभरात रोटरीच्या सेवाभावी कार्यात योगदान दिलेल्या रोटेरियन मेंबरचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी अध्यक्ष एजाज मुतवल्ली, निनाद शहा ,विलास कोरे,अशोक येणेगुरे,जितेंद्रकुमार जाजू, आनंद गंदगे ,स्वामींनाथ हिप्परगी,मनोज काटगाव,केदार नरोणे,गजानन पाटील,अनिल तोतला, महेश जवळगी, दिनेश पटेल,निलकंठ कापसे, दिनेश पटेल, संजीव नंदर्गी ,वैजिनाथ तालिकोटी,दत्ता कटारे,प्रदीप तोरसकर,सतीश शिंदे,सचिन किरनळी ,रुपाली शहा,सोनल जाजू, कोमल कापसे, हेमा शहा, रेणुका कोकळगी,गीता कोरे,प्रीती नरोणे, श्रुती वाली आदींसह रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील व सुनील बोराळकर यांनी केले तर आभार डॉ.वाली यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!