कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना म्हणाव तसा रोजगार उपलब्ध होत नाही. शेती हा गावाकडील लोकांचा प्रमुख उद्योग आहे. शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून महिलांना स्वावलंबी व स्वतःच्या पायावर उभा राहता यावे. या उद्देशानेच जिल्हा उद्योग समूहाशी महिला काँग्रेस अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी भेट घेऊन या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने काही करता येईल का हा विचार करून सुवर्ण लक्ष्मी फाउंडेशन व जिल्हा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने ४५ दिवसाचे शिवण क्लास प्रशिक्षण आयोजन केले होते.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, सातदुधनी, उडगी, संगोळगी, आदी परिसरातील महिलांना या माध्यमातून शिवण प्रशिक्षण देण्यात आले.घर बसल्या जागी महिलांना त्यांचा उदरनिर्वाह करता येईल या उद्देशाने मैंदर्गी येथील जुनी नगरपरिषद येथे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रत्येकाला स्टेफन म्हणून १५०० याप्रसंगी देण्यात आले.
यामध्ये लक्ष्मी चव्हाण, रेणुका स्वामी, सविता काळे, प्रभावती कुंभार, याश्मिन सुतार, मुक्ताबाई वाघमोडे, लक्ष्मी धनल्ली, रुबिना बडेघर, मिनाक्षी जानगुंडे, निकिता आरबाळे, सावित्री सावली आदी महिलांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उद्योग समूहाचे अध्यक्ष राजशेखर शिंदे उपस्थित होते.या प्रशिक्षणाबद्दल महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.