गुरुषांत माशाळ,
दुधनी दि.१६ : दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला येथे शांभवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित गंगामाई हॉस्पीटल यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरात १७५ जणांनी लाभ घेतला. मंगळवारी सकाळी दहा वाजता दुधनी विरक्त मठाचे मठाधीपती डॉ. शांतलिगेश्वर महास्वामीजी यांच्याहस्ते अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, यांच्या उपस्थीतीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. प्रमोद पवार ह्रदयरोग तज्ञ व टीमने कोरोनाचे नियम पाळुन एकुण १७५ जणांची तपासणी केली. यावेळी गरजूंना मोफत औषधं देण्यात आले. ज्यांना ऐंजीयोग्राफी व ऐंजीयोप्लास्टीची गरज असेल त्यांची ऐंजीयोग्राफी व ऐंजीयोप्लास्टी फाऊंडेशनच्या मोफत करण्यात येणार आहे, अशी माहीती शांभवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांनी सांगीतले.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकर म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शांभवी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे, व सुनंदा चिंचोळी, कोमल म्हेत्रे, संगीता पाटील, महानंदा कोटनुर, राजश्री माळगे, जगदेवी गद्दि, वनीता म्हेत्रे, सोनाली चिंचोळी, शबाना मोमीन आदि संचालिका सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. या शिबिराचे लाभ दुधनी व पंचक्रोशीतातील नागरिकांनी घेतले. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रथमेश म्हेत्रे व डॉ. उदय म्हेत्रे आणि कर्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कोरोनाच्या संकटातसुद्धा कोरोनाचे नियम पाळुन शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्व दुधनी नागरिकांची व दुधनी आरोग्य केंद्राच्या आशा वर्कर यांचा आभार फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांनी मानले. दुधनी नगरपालिकाचे मुख्याधिकारी अतीश वाळुंज यांच्या उपस्थितीत शिबिराचे समारोप करण्यात आले. याप्रसंगी म्हेत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.