ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा शंकर म्हेत्रे यांची निवड

अक्कलकोट, दि.३१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची तिसर्‍यांदा निवड करण्यात आली आहे.

शुक्रवारी याबाबतीत अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.पक्षसंघटन व पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी म्हेत्रे यांची नियुक्ती केल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.

गोरगरिबांच्या अडी-अडचणी,भांडण तंटे मिटविण्यात म्हेत्रे यांचा हातखंडा आहे. दानधर्म करण्यात स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा वारसा अविरतपणे त्यांनी जपला आहे. तरूण वर्गात त्यांची क्रेझ असून त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच दुधनीसह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या पुढील काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अविरतपणे जनसेवा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निवडीनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, आमदार प्रणिती शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!