ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांनी आखली रणनिती : सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत !

पुणे  : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निववडणुकीच्या आधी शरद पवारांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आज शरद पवार पुण्यात असून आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे. यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.

अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील सरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमचे सगळ्यांशी प्रेमाचे संबध आहेत. मोहिते पाटील, बबन शिंदे, पवार साहेब यांचे जुन संबध आहेत. बबन शिंदे यांचे पवार साहेबांसोबत खुप जुने संबध आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!