मुंबई : शिवसेनेत फुट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट झाले आहेत. शिंदे सत्तेत आल्यापासून ठाकरे गटकडून शिंदे गटावर रोज आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं, याचा खुलासा येत्या दोन-चार दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
पुढे बोलताना केसारकर यांनी कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा जम्मू- काश्मीर मध्ये पोहोचली आहे. काश्मीरमध्ये जाऊन कॉँग्रेसच्या यात्रेत सामील झालेल्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.
केसारकर म्हणाले की, हिंदुस्थानवर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस विरोध करत होती, त्यांना काश्मीरमध्ये जाऊन भेटणं एवढा मोठा अपमान बाळासाहेब ठाकरेंचा कुणीही केला नाही तो संजय राऊतांनी केला असं मला वाटतं. त्यामुळेच जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. असं दीपक केसरकर म्हणाले.