मुंबई : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 1 (शिंदे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या न आदेशानुसार, संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या सर्वांना तातडीने निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिंदे यांचे राजकीय भविष्य काय असणार, ते मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना दुसरीकडे शिंदे यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा उद्देश समोर ठेवून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेमणुकांत विद्यमान मंत्र्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून (शिंदे) पदाधिकारी नियुक्तीच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार विभागीय संपर्क नेते म्हणून कोकण विभागाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची नेमणूक केली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, मुंबई शहर व उपनगरासाठी सिद्धेश कदम आणि किरण पावसकर यांची निवड केली आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांसाठी आनंदराव जाधव, जालना, संभाजीनगर, परभणी व बीड जिल्ह्यांसाठी अर्जुन खोतकर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी विजय शिवतारे, पुणे, सोलापूर जिल्ह्यांसाठी संजय मशीलकर, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी दीपक सावंत, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांसाठी विलास पारकर आणि वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांसाठी विलास चावरी यांची विभागीय संपर्क नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. महायुतीतील तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांत समन्वय राखून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची रणनीती सर्व पदाधिकारी तयार करणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेश पाटील, धुळे जिल्ह्यासाठी प्रसाद ढोमसे, जळगाव जिल्ह्यासाठी सुनील चौधरी, रावेर जिल्ह्यासाठी विजय देशमुख, बुलढाणा जिल्ह्यासाठी अशोक शिंदे, अकोला जिल्ह्यासाठी भूपेंद्र कवळी, अमरावतीसाठी मनोज हिरवे, वर्धा जिल्ह्यासाठी परमेश्वर कदम, रामटेक जिल्ह्यासाठी अरुण जगताप, नागपूरसाठी अनिल पडवळ, भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी आशिष देसाई, गडचिरोली-चिमूर जिल्ह्यासाठी मंगेश काशीकर, चंद्रपूरसाठी किरण लांडगे, यवतमाळ-वाशिम जिल्ह्यासाठी गोपीकिशन बजोरिया, हिंगोली जिल्ह्यासाठी सुभाष सावंत, नांदेड जिल्ह्यासाठी दिलीप शिंदे, परभणी जिल्ह्यासाठी सुभाष साळुंखे, जालना जिल्ह्यासाठी विष्णू सावंत, छत्रपती संभाजीनगरसाठी अमित गीते, दिंडोरी जिल्ह्यासाठी सुनील पाटील, नाशिकसाठी जयंत साठे, पालघर जिल्ह्यासाठी रवींद्र फाटक, भिवंडीसाठी प्रकाश पाटील, रायगडसाठी मंगेश सातमकर, मावळसाठी विश्वनाथ राणे, पुणे जिल्ह्यासाठी किशोर भोसले, शिरूरसाठी अशोक पाटील, नगर जिल्ह्यासाठी अभिजीत कदम, शिर्डीसाठी राजेंद्र चौधरी, बीड जिल्ह्यासाठी डॉ. विजय पाटील, धाराशिव जिल्ह्यासाठी रवींद्र गायकवाड, लातूर जिल्ह्यासाठी बालाजी काकडे, सोलापूर जिल्ह्यासाठी इरफान सय्यद, माढा जिल्ह्यासाठी कृष्णा हेगडे, सांगली जिल्ह्यासाठी राजेश क्षीरसागर, सातारा जिल्ह्यासाठी शरद कणसे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी राजेंद्र फाटक, कोल्हापूरसाठी उदय सामंत, तर हातकणंगले जिल्ह्यासाठी योगेश जानकर यांची जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.