सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना न्याय देणार;हळदी कुंकू कार्यक्रमात शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन
अक्कलकोट,दि.३१ : अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन हे केवळ महिलांच्या विकासासाठी स्थापना केले असून ‘अम्मा’ म्हणजे फक्त माझी आई नाही तर तालुक्यातील सर्वच महिला या माझ्या आईसारखे आहेत.त्यामुळे महिलांना स्वावलंबी करावे ही माझ्या आईची इच्छा होती या उद्देशानेच ही संस्था आपल्या सेवेसाठी कार्यरत आहे. तालुक्यातील माझ्या सर्व माता बहिणींचा आशीर्वाद माझ्या आणि म्हेत्रे परिवाराच्या पाठीशी असू द्या,असे आवाहन महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले.
अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंगल कार्यालय येथे वीरशैव महिला समाज मंडळ व सुनिता हडलगी यांच्यावतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.व्यासपीठावर सरस्वती रामदे,अनिता पराणे, सुनंदा भकरे उपस्थित होत्या.पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाल्या की,
जेव्हा एखादी संघटना एखादी संस्था स्थापन केली जाते. त्यावेळी विशिष्ट जातीची, विशिष्ट धर्माची नसते. त्यामध्ये सर्व धर्म समभाव समजून त्यामध्ये कुठल्या प्रकारचे जातीभेद न करता सर्वांना समान न्याय दिला पाहिजे,
असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा पाटील होत्या.प्रारंभी प्रतिमापूजन डॉ.सुप्रिया संगोळगी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुषमा संगोळगी, दिपा भकरे,वर्षा म्हेत्रे,
शिल्पा बोधले,अन्नपूर्णा भुसनूरे, जगदेवी यळसंगी, सिमा म्हेत्रे,डॉ.शिवलिला माळी,सविता हडलगी,डॉ.शैलजा चिंचोळी, रेखा भकरे, सुधा इसापूरे यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण व प्रियांका अजगोंडा यांनी केले.यावेळी अक्कलकोट शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘अम्मा’ फाऊंडेशनकडून
विविध बक्षीसे…!
यावेळी मनोरंजनात्मक स्पर्धा घेऊन अम्मा फाऊंडेशनकडून विविध बक्षिसे देण्यात आली. यात लकी ड्रॉ काढून अकरा जोड चांदीचे सौभाग्य अलंकार व एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे घेणे व पारंपारिक वेशभूषा इत्यादी स्पर्धा घेऊन विजेत्यांना रेशमी साडी फाउंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मी म्हेत्रे
यांच्याकडून भेट देण्यात आली.